मातेच्या परमार्थाची तुलना कुठेही सापडणार नाही - उत्तम महाराज बडे

मातेच्या परमार्थाची तुलना कुठेही सापडणार नाही - उत्तम महाराज बडे

Published on

जुनी सांगवी, ता.९ ः श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त आठवडाभरापासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्यात आला. काल्याच्या कीर्तनात उत्तम महाराज बडे यांनी मातृ शक्तीच्या महत्त्वावर विचार मांडले. ‘मातेच्या परमार्थाची तुलना जगात कुठेही सापडणार नाही, असे सांगत त्यांनी स्त्री-शक्तीचे कुटुंब व समाज घडवण्यातील योगदान संत शिरोमणी तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर यांच्या अभंगांचे दाखले देत सांगितले.
काल्याच्या कीर्तनाला परिसरातील भाविकांनी उपस्थिती लावली. भक्तिमय वातावरणात अभंग, प्रवचन आणि हरिनामाचा गजर झाला. कार्यक्रमाच्या शेवटी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत गजानन महाराज सर्व विश्वस्त व सेवेकरी सर्व सेवा न्यास यांच्या वतीने सप्ताहाचे आयोजन व व्यवस्था करण्यात आली होती.
या प्रसंगी आयोजक, स्थानिक पदाधिकारी व भाविक सेवेत उपस्थित होते. प्रकट दिनाचे औचित्य साधत समाजात सद्भाव, संस्कार आणि अध्यात्माची प्रेरणा घ्यावी असे श्री संत गजानन महाराज सर्व सेवा न्यास मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com