बिश्नोई टोळीच्या नावे खंडणीसाठी फोन

बिश्नोई टोळीच्या नावे खंडणीसाठी फोन
Published on

पिंपरी, ता. २६ : ‘‘पाच कोटी रुपये द्या, अन्यथा कुटुंबासह सर्वांना संपवेन’’ अशी धमकी वाकड येथील एका महिलेला देण्यात आली. परदेशातून हा फोन कॉल करणाऱ्या व्यक्तीने बिश्नोई टोळीतून बोलत असल्याचे सांगितले, असे महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार अर्जुन बिश्नोई असे नाव सांगणाऱ्याविरुद्ध वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘‘सदर महिला वाकडमध्ये, तर तिचा पती कामानिमित्त दुबईत वास्तव्यास आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू करण्यात आला आहे,’’ असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कडलग यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com