
अठावीस वर्षांनी पुन्हा भरला दहावीचा वर्ग
पिंपळे गुरव, ता. १० ः पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप विद्यालय सांगवी येथील १९९४ मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. तब्बल २८ वर्षानंतर दहावीचा वर्ग भरला. शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थी एकत्र आले. स्नेहमेळाव्याच्या अध्यक्ष स्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपसचिव लक्ष्मण पवार उपस्थित होते.
शाळेची पहिली घंटा, राष्ट्रगीत, प्रार्थना आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली देत कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वीपणे काम करीत असल्याने शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी प्राचार्य बाळकृष्ण मापारी, उपप्राचार्य विलास निमसे, शिक्षक वृंद यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे शाळेतील मामांचाही सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी विद्यालयास संगणक भेट दिला. सूत्रसंचालन डॉ. नंदा शिंगाडे यांनी केले. प्राध्यापक आरती भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संजय मराठे, तानाजी जवळकर, रवींद्र कवितके, गणेश नवगिरे, गिरीश शेट्टी, सचिन घाटगे, मधुमती देशपांडे, प्रमिला काटकर, योजना शिंदे, वर्षा नाईक, प्राध्यापक संजय मेमाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.