दिव्यांगांना ई-ट्रायसिकलचे पिंपळे गुरवमध्ये विनामूल्य वितरण
पिंपळे गुरव, ता. २९ ः दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या सीएसआर योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, (अलीमको) मुंबई आणि महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने १५० दिव्यांग लाभार्थ्यांना मोटारचलित ई-ट्रायसिकल विनामूल्य वितरित करण्यात आल्या.
पिंपळे गुरव येथील फेमस हॉल येथे वरील कार्यक्रम झाला. भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलीमको) चे व्यवस्थापक कमलेश यादव, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कान्हेकर, सल्लागार अभिजीत मुरुगकर, नंदकुमार फुले, जिल्हा समन्वयक यशवंत सोळंके, श्रुतिका मुंगी, प्रहार संघटनेचे अध्यक्ष धर्मेंद्र सातव, महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष दत्ता भोसले तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दिव्यांग कक्षाचे समन्वयक धनंजय भोळे यांच्यासह दिव्यांग लाभार्थी व त्यांच्या पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
यापूर्वी आयोजित चार नोंदणी व तपासणी शिबिरांमध्ये १९८ दिव्यांग व्यक्तींची निवड करण्यात आली होती. त्यापैकी १५० लाभार्थ्यांना या कार्यक्रमात ट्रायसिकलचे वितरण करण्यात आले. विजय कान्हेकर यांनी प्रास्ताविक केले. हरिदास शिंदे यांनी
सूत्रसंचालन केले; तर अरविंद झाडे यांनी आभार मानले.
PMG25B02538
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.