रोझलँड रेसिडेन्सीत तीव्र पाणीटंचाईचा प्रकार
पिंपळे सौदागर, ता.११ ः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात अचानक घट झाल्यामुळे पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी सोसायटीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. नळांना कमी दाबाने पाणी, तर काही वेळा पूर्णपणे पाणीपुरवठा खंडित झाल्याने रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागला.
या पार्श्वभूमीवर सोसायटीचे सचिव विक्रम शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेत लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत भाजप अध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक शत्रुघ्न काटे, कुंदा भिसे व अनिता काटे यांनी महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोसायटीला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
तातडीच्या उपाययोजने अंतर्गत १० हजार लिटर क्षमतेचे पाण्याचे पाच टँकर उपलब्ध करून देण्यात आले. तसेच नियमित व सुरळीत पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी जलवाहिन्यांची तपासणी व तांत्रिक अडचणी दूर करण्याचेही आश्वासन देण्यात आले.
सोसायटीचे अध्यक्ष महेश चौधरी, व्यवस्थापन समिती, रहिवाशांनी नगरसेवकांच्या तत्पर हस्तक्षेपाबद्दल आभार व्यक्त केले. सोसायटी कमिटी सदस्या बबिता बनर्जी, सदस्य शरद जाधव आणि चंदन चौरसिया यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजाविली.
PMG26B03109
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

