निवडणूक कामकाजासाठी पालिकेच्या २४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पोटनिवडणूक ः सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांचा आदेश
महापालिकेच्या २४५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
पिंपरी,ता.२४ ः चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणूक विषयक कामकाजासाठी महापालिकेच्या २४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपविल्या आहेत. याबाबतचा आदेश सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांनी काढला.
चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. २७ फेब्रुवारीला मतदान तर २ मार्चला मतमोजणी होणार आहे.
अशी आहे जबाबदारी
मतदान कर्मचारी नेमणुकीसाठी इ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक ज्ञानेश्वर ढवळे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. मतदान कर्मचारी प्रशिक्षण नियोजन व व्यवस्थापन विभागासाठी कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, टपाली मतदानासाठी सहायक आयुक्त राजेश आगळे, निवडणूक साहित्य संकलन व वितरणासाठी भांडार अधिकारी मुबारक पानसरे, मतदान यंत्रे, स्ट्रॉगरुमसाठी सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे, निवडणूक कर्मचारी भत्ता वाटपासाठी लेखाधिकारी अरुण सुपे, वाहने परवाना देणे प्रशासन अधिकारी राजीव घुले, आचारसंहिता कक्षासासाठी कार्यकारी अभियंता आबासाहेब ढवळे, मीडिया सेलसाठी किरण गायकवाड, वाहन अधिग्रहण विभागासाठी कार्यव्यस्थापक कैलास दिवेकर, वाहतूक आराखडा व व्यवस्थापनासाठी पीएमपीएमएलचे डीएमई दत्तात्रेय माळी, उमेदवार खर्चाचे लेखे ठेवणे विभागासाठी लेखाधिकारी इलाही शेख आणि चिन्हांकित मतदार यादी तयार करण्याच्या विभागासाठी सहाय्यक आयुक्त सीताराम बहरे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
अशी झाल्या नियुक्ती
मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी असे १२ अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण नियोजन व व्यवस्थापनासाठी ७, टपाली मतदानासाठी ११, निवडणूक साहित्य संकलन व वितरणासाठी २४, निवड मतदान यंत्र व स्ट्रॉंग रूम ४२, निवडणूक कर्मचारी भत्ता वाटप १२, वाहन परवाने व उमेदवार मतदान प्रतिनिधी ओळखपत्र वाटप ९, आचारसंहिता कक्ष १६, विविध भरारी पथके १८, मीडिया सेल ६ जण, निवडणूक वाहन सुविधा ७. वाहतूक आराखडा व व्यवस्थापन ८, निवडणूक खर्चाचे लेखे ठेवणे १२, चिन्हांकित मतदार यादी तयार करणे ३६, निवडणूक विषयक संगणकीकरण ७, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयासाठी १८ अधिकारी, कर्मचारी अशा २४५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पोटनिवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्ती केली आहे. या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ग क्षेत्रीय कार्यालयात तत्काळ रुजू व्हावे, असे आदेशात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.