‘जल्लोष शिक्षणाचा’ (फोटो फिचर) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जल्लोष शिक्षणाचा’ (फोटो फिचर)
‘जल्लोष शिक्षणाचा’ (फोटो फिचर)

‘जल्लोष शिक्षणाचा’ (फोटो फिचर)

sakal_logo
By

‘जल्लोष शिक्षणाचा’ (फोटो फिचर)
विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान-शैक्षणिक प्रदर्शन, ग्रंथालय, बुक स्टॉल, फूड स्टॉल, जादूचे प्रयोग, पपेट शो, शिक्षकांच्या स्पर्धा, प्रश्नमंजूषा, ट्रेझर हन्टसह अशा नानाविध कार्यक्रमांनी सजलेल्‍या ‘जल्लोष शिक्षणाचा’ या प्रदर्शनास भेट देण्यासाठी दुसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. स्टेजवरील नृत्य स्पर्धा, विद्यार्थ्यांचे विविध कलागुण पाहण्यात अनेक विद्यार्थी हरवून गेले होते. पालिकेच्या व इतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर तयार केलेले मॉडेल पाहण्यासाठी विविध शाळांच्या मुले व शिक्षकांनी गर्दी केली व प्रयोग समजून घेतले. तसेच अनेकांनी शिक्षकांबरोबर छायाचित्र काढून लगेच त्याची प्रिंट देखील घेतली. काही विद्यार्थ्यांनी कुतूहलापोटी पोलिस काका दिसल्यावर त्यांच्याशी हस्तांदोलन देखील केले. बुधवारी (ता.२५) चिंचवड येथील ऑटो क्लस्टरच्या प्रांगणात दोन दिवसीय ‘जल्लोष शिक्षणाचा’ या नावीन्यपूर्ण कार्यक्रमाचा समारोप झाला. त्याची ही चित्रमय झलक.