Sat, March 25, 2023

निगडी डेपोमध्ये हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
निगडी डेपोमध्ये हळदी-कुंकू समारंभ उत्साहात
Published on : 28 January 2023, 9:17 am
पिंपरी, ता. २८ : पीएमपीएमएल, निगडी आगार महिला कर्मचारी यांच्या वतीने २७ तारखेला हळदी-कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. महिला वाहक, सफाई कामगार व कार्यालयीन महिला कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. यावेळी हळदीकुंकू व तिळगुळ वाटप करण्यात आले.
कार्यक्रमात संगीत खुर्ची ऊखाने व गाण्यांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. यावेळी माजी महापौर उषा ढोरे, माजी उपमहापौर शैलजा मोरे आणि नगरसेविका शर्मिला बाबर, मनीषा रवींद्र लांडगे, उज्वला मोहन तापकीर, गौरी हेमंत जोशी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता मृणाली शिंदे, जयश्री घोसाळकर, अनिता मुरकुटे व अर्चना लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन मृणाली शिंदे व मालती श्रावणी यांनी केले. सोनाली पाटील यांनी आभार मानले.