Fri, March 31, 2023

गृहनिर्माण सोसायट्यांसाठी रविवारी
पिंपळे सौदागारला सहकार दरबार
गृहनिर्माण सोसायट्यांसाठी रविवारी पिंपळे सौदागारला सहकार दरबार
Published on : 31 January 2023, 8:52 am
पिंपरी, ता. ३१ ः पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाने पिंपळे सौदागर येथे रविवारी (ता. ५) विशेष सहकार दरबाराचे आयोजन केले आहे. सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत होणाऱ्या सहकार दरबारासाठी नाना काटे सोशल फाउंडेशनचे सहकार्य लाभले आहे. पिंपळे सौदागर येथील शिवार चौकातील हॉटेल शिवार गार्डनमध्ये दरबार भरणार आहे. सहकार आयुक्त अनिल कवडे आणि महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन मार्गदर्शन करतील. सर्व गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांसह विशेष सहकार दरबारात सहभागी व्हावे, आपले प्रश्न ९५५२५४६६०७ या क्रमांकावर पाठवावे, प्रश्नकर्ता व सोसायटीचे नाव प्रश्नाखाली अवश्य टाकावे, असे आवाहन पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट्स महासंघाचे चारुहास कुलकर्णी यांनी केले आहे.