
संत शिरोमणी गोरोबाकाका समाज सेवा संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्धापन साजरा
कुंभार समाजाचा
मेळावा उत्साहात
पिंपरी, ता. ३१ : संत गोरोबाकाका विठ्ठल-रुक्मणी मंदिर नेहरुनगर, पिंपरी-चिंचवड येथे संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त मेळावा उत्साहात झाला. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात स्थायिक असलेले कुंभार समाजातील बांधव मोठ्या संख्येने आले होते.
कोकणातून खेड कुंभाड, नगर, पनवेल, कल्याण, मुंबईमधील समाज बांधव उपस्थित होते. गायक संजय व शिवानी साळवी यांच्या आवाजात देशभक्तिपर गीताने मंदिर सभागृहातील वातावरण गजबजून गेले होते.
हनुमंत भोसले अध्यक्षस्थानी होते. माजी नगरसेविका वैशाली घोडेकर, संस्थेचे मार्गदर्शक सतीश दरेकर, ज्येष्ठ विचारवंत सुरेश कोते, कार्याध्यक्ष महाराष्ट्र महेश सायकर, डॉ. सुरेश काळे, पुणे जिल्हा कुंभार समाजन्नोती मंडळाचे अध्यक्ष संतोष कुंभार, प्रतिभा ओव्हाळे उपस्थित होते. शिशुगट ते पदवीधर गुणवंतांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संपादक संजय राजे, कार्याध्यक्ष सचिव अजय वीरकर, काशिराम साळवी, सुभेदार सखाराम परबते, शहराध्यक्ष सत्यवान साळवी, सुनील नरवणकर, उद्योजक सतीश परबते, दारुगोळा फॅक्टरीचे कार्यसमिती सदस्य सुरेश कुंभार, एचडीएफसी शाखा व्यवस्थापक सतीश मोरे, सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष अजय पाताडे उपस्थित होते. या प्रसंगी कुंभ विकास साप्ताहिक २०२३ चे प्रकाशन झाले.
काशिराम साळवी यांना समाज गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष अनिल नरवणकर यांनी सूत्रसंचालन केले. समाजाध्यक्ष शांताराम गुडेकर यांनी स्वागत केले.
फोटोः 21721