Tue, March 28, 2023

चिंचवड, आळंदी येथून तीन पिस्तूल जप्त; तिघांना अटक
चिंचवड, आळंदी येथून तीन पिस्तूल जप्त; तिघांना अटक
Published on : 31 January 2023, 1:07 am
पिंपरी, ता. ३१ : चिंचवड व आळंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कारवाईत तीन पिस्तूल व तीन काडतुसे जप्त करत तिघांना अटक केली. चिंचवड गावातील श्री स्वामी समर्थ हौसिंग सोसायटी शेजारील पुलावरून अजय शंकर राठोड (रा. पांडवनगर वस्ती, पाषाण) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३४ हजारांचे एक पिस्तूल व सातशे रुपयांचे एक काडतूस जप्त केले. तसेच श्रीधरनगर रेल्वे पटरीजवळून रोहित उर्फ येशू दत्ता धावारे (वय १९, रा. आनंदनगर झोपडपट्टी, चिंचवड) याला अंमली विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ३५ हजारांचे एक पिस्तूल व सातशे रुपयांचे एक काडतूस जप्त केले. यासह आळंदी येथून विष्णू आनंदा नरवडे (वय २२, रा. मरकळ रोड , आळंदी) याच्याकडून तीस हजारांचे एक पिस्तूल व पाचशे रुपयांचे एक काडतूस जप्त केले.