द्रृतगती मार्गावरील खड्ड, भेगांमध्ये वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रृतगती मार्गावरील खड्ड, भेगांमध्ये वाढ
द्रृतगती मार्गावरील खड्ड, भेगांमध्ये वाढ

द्रृतगती मार्गावरील खड्ड, भेगांमध्ये वाढ

sakal_logo
By

सोमाटणे, ता. ५ ः रस्ता दुरुस्तीचे काम न केल्याने द्रुतगती मार्गावरील उर्से परंदवडी गावादरम्यान रस्त्यात खड्डे व भेगा पडल्या आहेत. त्यामुळे
अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळा उघडल्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्यावतीने रस्त्याची व्यवस्था पाहणाऱ्या आयआरबी कंपनीमार्फत दरवर्षी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दुरुस्तीचे काम केले जात होते. यावर्षी अद्याप रस्ता दुरुस्तीचे काम न केल्याने उर्से परंदवडी ओझर्डे गावादरम्यान रस्त्याला पडलेले खड्डे व भेगांचा आकार, लांबी रुंदी वाढली आहे. काही ठिकाणी तुटलेल्या भेगांच्या कडा टोकदार झाल्याने रस्त्यावरून वाहन जाताना वाहनाचे टायर फुटण्याची शक्यता अधिक असून यामुळे या रस्त्यावर अपघाताचा धोका वाढला आहे. अपघात टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने तातडीने रस्त्याला पडलेले खड्डे व भेगा बुजविण्याची गरज आहे.
उर्से ः खडी सिमेंट तुटल्याने रस्त्याला पडलेल्या भेगा.