प्रेरणा बँकेची विश्वासार्हता मोठी ः विद्याधर अनास्कर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेरणा बँकेची विश्वासार्हता
मोठी ः विद्याधर अनास्कर
प्रेरणा बँकेची विश्वासार्हता मोठी ः विद्याधर अनास्कर

प्रेरणा बँकेची विश्वासार्हता मोठी ः विद्याधर अनास्कर

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः सहकारात सांघिक कार्यपद्धती महत्त्वाची असून, ती प्रेरणा बॅंकेत दिसून येत आहे. बँकेची विश्वासार्हता मोठी आहे. तिचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यामुळेच भविष्यात ती अग्रगण्य बँक म्हणून नावलौकिकास येईल, असा विश्वास राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केला.
थेरगाव येथील प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी अनास्कर बोलत होते. संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन नानासाहेब नवले अध्यक्षस्थानी होते. पुणे जिल्हा बँक असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष मोहिते, चेअरमन कांतिलाल गुजर, व्हाइस चेअरमन सुरेश पारखी, संस्थापक तुकाराम गुजर, संचालक श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, संजय पठारे, संतोष मुंगसे, अक्षय गुजर, नाना शिवले, सनदी लेखापाल नंदकिशोर तोष्णीवाल, ॲड. अजितकुमार जाधव, राजाराम रंदील, राजेंद्र शिरसाट, सुजाता पारखी, चंद्रभागा भिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी सोनवणे आदी उपस्थित होते.
त्यांच्या हस्ते बॅंकेचा क्यू आर कोड व लोगोचे अनावरण झाले. बँकेच्या स्थापनेपासून २४ वर्षांच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे सभासद, ठेवीदार व खातेदारांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रेरणा कृतज्ञता पुरस्काराने सन्मानित केले. यात नामदेव कस्पटे, सुखदेव बुचडे, शिवराम पवार, विठ्ठल साखरे, स्वप्नील काटे, प्रभाकर गुजर, बाळासाहेब हुलावळे, रामदास वाल्हेकर, नारायण मानकर, प्रल्हाद जांभूळकर, बाळू नवले, भिवाजी बारणे, सागर मुऱ्हे, खंडू मोरे, संदीप नेवाळे, भरत कड, दीपाली तापकीर, मच्छिंद्र गवळी, पंढरीनाथ भोसले, राजाराम भुजबळ, रोहिदास भालेकर, किसन जगताप, संदीप गायकवाड, संदीप गाडे, सोमनाथ बेलदरे यांचा समावेश होता.
बँकेचे चेअरमन कांतिलाल गुजर म्हणाले, ‘‘बॅंकेने रौप्य महोत्सवी वर्षासाठी २५ महिने २५ दिवसांसाठी सर्व सभासदांकरिता ७.२५ टक्के व्याजदर तर ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.५० टक्के व्याजदर ही नवी ठेव योजना जाहीर केली आहे. वर्षभर ग्राहक व सभासदांसाठी अनेक उपक्रम बँकेमार्फत राबविले जाणार आहेत. सध्या बँकेच्या १५ शाखा असून, आजपर्यंत ६०० कोटींचा व्यावसायिक टप्पा पूर्ण केला आहे. एक हजार कोटींचा व्यावसायिक टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ’’ नाना शिवले व संचिता जगताप यांनी सूत्रसंचालन केले. श्रीधर वाल्हेकर यांनी आभार मानले.
फोटोः 22949