Fri, March 24, 2023

श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक
संघाचा वर्धापनदिन उत्साहात
श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात
Published on : 6 February 2023, 9:39 am
पिंपरी, ता. ६ ः शाहूनगर येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचा नववा वर्धापन दिन उत्साहात झाला. संघाचे अध्यक्ष प्रा. हरिनारायण शेळके यांनी प्रास्ताविक करून, संघाच्या कार्याचा आढावा घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते स्वामी हस्तलिखित विशेषांकाचे प्रकाशन झाले. अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे होते. नजराणा हास्याचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम दिलीप हल्ल्याळ व अभिनेत्री स्मिता ओक यांनी सादर केला. सारिका रिकामे यांनी सूत्रसंचालन केले.