‘एमएम’तर्फे रविवारी काळेवाडीत मिनी मॅरेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एमएम’तर्फे रविवारी
काळेवाडीत मिनी मॅरेथॉन
‘एमएम’तर्फे रविवारी काळेवाडीत मिनी मॅरेथॉन

‘एमएम’तर्फे रविवारी काळेवाडीत मिनी मॅरेथॉन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः मराठवाडा मित्रमंडळ पॉलिटेक्निक पदविका (डिप्लोमा) महाविद्यालयातर्फे रविवारी (ता. १२) सात किलोमीटरची मिनी मॅरेथॉन आयोजित केली आहे. त्यातून ‘क्लीन सिटी-स्मार्ट सिटी’ हा सामाजिक संदेश दिला जाणार आहे. विमल सन्स, वंडर कार्स, एसपीव्हीएस ग्रुप, स्टुडिओ ट्रॅफिक जाम, ‘यिन’ नेटवर्क आणि किंग रेस्टॉरंट प्रायोजित पार्टनर आहेत, अशी माहिती प्राचार्या गीता जोशी यांनी दिली. रविवारी सकाळी सहाला एम. एम. पॉलिटेक्निक क्रीडांगण काळेवाडी येथून मॅरेथॉनला प्रारंभ होईल. बीआरटी रोड- ज्योतिबा गार्डन - एम्पायर इस्टेट - ऑटो क्लस्टर - यू टर्न घेऊन पुन्हा एम्पायर इस्टेट - ज्योतिबा गार्डन मार्गे संस्थेच्या थेरगाव (काळेवाडी) येथील संकुलात समारोप होईल. मॅरेथॉन १२ वर्षांवरील सर्वांसाठी खुली आहे. नाव नोंदणी सोय संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे आयोजक संदीप घोगरे यांनी कळवले आहे.