
आपच्यावतीने मनोहर पाटील तर; संभाजी ब्रिगेडतर्फे प्रविण कदम
पाटील, कदम यांचे
उमेदवारी अर्ज दाखल
पिंपरी, ता. ७ : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने मनोहर पाटील यांनी तर संभाजी बिग्रेडच्या वतीने शहराध्यक्ष प्रवीण कदम यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
पाटील यांनी अर्ज दाखल केला. या वेळी राज्य सचिव धनंजय शिंदे, शहराध्यक्ष अनुप वर्मा, चेतन बेंद्रे, वहाब शेख, महेश पाटील, स्मिता पवार आदि उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटील यांनी अर्ज दाखल केला. प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे, मनोज गायकवाड, स्मिता शिंदे आदि उपस्थित होते.
अपक्ष उमेदवाराने लावले कामाला
रयत स्वाभिमानी संघटनेचे राजू काळे यांनी मंगळवारी शेवटच्या दिवशी अर्ज भरला. अर्ज भरताना जमा करावयाची दहा हजार रुपयांची रक्कम त्यांनी चिल्लर स्वरूपात आणली होती. ही चिल्लर एक, दोन व पाच रुपयांच्या नाण्यांच्या स्वरूपात होती. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ही चिल्लर मोजण्याच्या कामाला काळे यांनी लावल्याची चर्चा कार्यालय परिसरात होती.