शैक्षणि दर्जा सुधारण्यासाठी निविदा प्रसिद्ध

शैक्षणि दर्जा सुधारण्यासाठी निविदा प्रसिद्ध

पिंपरी, ता. ८ ः पीसीएमसी स्कूल पॅटर्ननुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी शाळांची एकसमान रचना करण्यात येणार आहे. त्या कामांची निविदा स्थापत्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. काम झाल्यानंतर पालिकेच्या शाळा एकसारख्या दिसणार आहेत. पालिकेतील शाळेत सुमारे ५० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सध्या सर्व शाळांची रचना व रंगसंगती वेगवेगळी आहे. या शाळांपैकी ३८ शाळांची मॉडेल स्कूल म्हणून निवड करण्यात आली आहे. पीसीएमसी स्कूल या पॅटर्नअंतर्गत या ३८ शाळांची रचना एकसमान करण्यात येणार आहे. त्या सर्व शाळा इमारती एका रंगसंगतीमध्ये रंगविल्या जाणार आहे. प्रवेशद्वार, नामफलक, शाळांचे बोधचिन्ह, वर्ग खोल्या व स्वच्छतागृहाची दुरुस्ती करून सुशोभीकरण केले जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांची वेगळी ओळख निर्माण होऊन नागरिकांना ती लगेच ओळखता येणार आहे. त्या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालिकेच्या शाळा
प्राथमिक शाळा - ११०
माध्यमिक शाळा - १८
संतपीठ विद्यालय - १
एकूण ः १२९

महापालिका शाळेत अनेक गुणवंत व हुशार विद्यार्थी आहेत. अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना भारत दर्शन घडविले जाणार आहे. अवकाश संशोधन केंद्र आणि बंगळूर, देशाची राजधानी दिल्ली अशा ठिकाणी शैक्षणिक सहल काढली जाणार आहे. या उपक्रमात राष्ट्रीय व राज्य क्रीडा स्पर्धेत चमकलेल्या खेळाडूंचाही समावेश करण्याचा विचार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com