Tue, March 28, 2023

इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे
अद्ययावत बस थांबा
इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे अद्ययावत बस थांबा
Published on : 9 February 2023, 9:10 am
पिंपरी, ता. ९ : चाकण-खालूंब्रे ते निगडी मार्ग क्रमांक ३६९ व निगडी ते वासोली या मार्गावर फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स (इ) प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने परिसरातील प्रवाशांच्या सेवेसाठी अद्ययावत व पिण्याच्या पाण्याच्या सोयीयुक्त बस थांबा उभारण्यात आला आहे. या बस थांब्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात झाला. फ्लॅश ग्रुपचे अर्थिक संचालक संजय देशपांडे, मेटॅलिक विभागाचे व्यावसाय प्रकल्प प्रमुख रविंद्र चव्हाण, पीएमपीएमएल निगडी आगाराचे व्यवस्थापक शांताराम वाघेरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील कामगार व कर्मचारी, रविंद्र लांडगे, राजेंद्र टकले, मोहन तापकीर, विजय राजुडे, रामदास गवारी आदि उपस्थित होते.