
‘आर्थिक साक्षरतेतूनच समृद्ध समाजनिमिर्ती शक्य’
पिंपरी, ता. ९ : ‘‘बचत, गुंतवणुकीच्या पलिकडे आपण अर्थशास्त्र समजून घेत नाहीत. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण आणि नोकरी, व्यवसाय एवढ्यापुरते मर्यादित न राहता प्रत्येकामध्ये आर्थिक साक्षरता आणणे, ही काळाची गरज आहे. तरच समृद्ध समाजाची निर्मिती होऊ शकते,’’ असे मत अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुनील सालके यांनी मांडले.
पिंपरीतील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगताप, प्रा. उद्धव घोडके, उपप्राचार्य मृणालिनी शेखर, प्रा. अनिकेत खत्री, अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. भारती यादव, डॉ. प्रतिमा कदम आदी उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन आठवणींना उजाळा दिला. डॉ. भारती यादव यांनी प्रास्ताविक केले. अॅड. अशोक डोंगरे, चंचल गायकवाड, नागनाथ रोकडे, प्रा. नवनीत हजारे, प्रा. मीना बोकन, सुभाष हेगडे, सुरेश पाटील, संजीवन गायकवाड यांनी संयोजन केले. डॉ. प्रतिमा कदम यांनी आभार मानले.