भाजप, राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारक रिंगणात
विधानसभा पोटनिवडणूक ः दिग्गज मंडळींमुळे प्रचाराची रंगत वाढणार

भाजप, राष्ट्रवादीकडून स्टार प्रचारक रिंगणात विधानसभा पोटनिवडणूक ः दिग्गज मंडळींमुळे प्रचाराची रंगत वाढणार

पिंपरी, ता. ९ : चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकांसाठी भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने स्टार प्रचारकांची फौज रिंगणात उतरवली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. अमोल कोल्हे प्रचाराची आघाडी सांभाळणार आहेत तर भाजपच्यावतीने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे, रावसाहेब दानवे-पाटील, भागवत कराड, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी दिग्गज मंडळी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभागी होणार आहेत.

राष्ट्रवादीकडून २० जण प्रचारात
---------------------
चिंचवड व कसबा विधानसभा मतदारसंघांसाठी येत्या २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश समितीच्यावतीने सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना २० स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. केंद्र, राज्य, ग्रामीण आणि शहर पातळीवरील नेत्यांचा निवडणूक प्रचारात सहभाग करून घेण्यात आला आहे. स्टार प्रचारकांमध्ये पवार यांच्यासह माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री एकनाथ खडसे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, खासदार वंदना चव्हाण, फौजिया खान, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार सुनील शेळके, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, आमदार नीलेश लंके, आमदार अमोल मिटकरी, सुभान अली शेख यांचा समावेश आहे.

भाजपकडून ४० जणांची फौज
भाजपच्या केंद्रीय समितीने तब्बल चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय आणि राज्यातील मंत्र्यांसह स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंग यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे. त्यात निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे सभापती प्रवीण दरेकर, खासदार उदयनराजे भोसले, गिरीश बापट, मंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार विनोद तावडे, श्रीकांत भारतीय, रवींद्र चव्हाण, सुनील कर्जतकर, खासदार धनंजय महाडीक, आमदार राहुल कुल, गोपीचंद पडळकर, बाळा भेगडे, विजय देशमुख, माधुरी मिसाळ, विक्रांत पाटील, विजय चौधरी, जगदीश मुळीक, राजेश पांडे, सुधाकर भालेराव, वासुदेव काळे, इजाझ देशमुख, संदीप भंडारी, प्रकाश जावडेकर, दिलीप कांबळे, शहराध्यक्ष महेश लांडगे, हर्षवर्धन पाटील, उमा खापरे, अमर साबळे अशा चाळीस जणांचा यादीत समावेश आहे.

फोटो ः 23614, 23611

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com