Tue, March 21, 2023

दुचाकीच्या धडकेत
दोघे भाऊ गंभीर जखमी
दुचाकीच्या धडकेत दोघे भाऊ गंभीर जखमी
Published on : 9 February 2023, 3:34 am
पिंपरी, ता. ९ : भरधाव दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. ही घटना माण येथे घडली.
बलबीर मांगीलाल सोलंकी (रा. व्हॅलोसिटी सोसायटी, हिंजवडी फेज ३, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे त्यांचे दुचाकीवरून त्यांचे लहान भाऊ गजेंद्र मांगीलाल सोलंकी यांच्यासह जात होते. दरम्यान, फिर्यादी हे हिंजवडी येथे यू टर्न घेत असताना दुचाकीवरून भरधाव आलेल्या आरोपीने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी व त्यांच्या भावाच्या पायाला व हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले.
------------------