Wed, March 29, 2023

जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा १५ फेब्रुवारीपासून
जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा १५ फेब्रुवारीपासून
Published on : 10 February 2023, 3:13 am
पिंपरी : पिंपरीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धा १५ फेब्रुवारीपासून होणार आहे. जिल्हा क्रीडा परिषद, एफ.सी. बायर्न कप, महापालिका क्रीडा विभाग यांनी याचे आयोजन केले आहे. १४ वर्षाखालील वयोगटातील या स्पर्धेत २० संघ सहभागी होत आहेत. जिल्हास्तरावर स्पर्धेचे आयोजन केले असून विजयी संघामधून अंतिम संघ व खेळाडू निवडला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य स्तरावरील स्पर्धा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. प्रवेश अर्ज १३ फेब्रुवारी रोजी क्रीडा विभाग, खराळवाडी येथेही मिळतील.