वर्षानुवर्षे एकाच विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षानुवर्षे एकाच विभागातील
कर्मचाऱ्यांची बदली होणार?
वर्षानुवर्षे एकाच विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होणार?

वर्षानुवर्षे एकाच विभागातील कर्मचाऱ्यांची बदली होणार?

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः मर्जीतील अधिकारी, कर्मचारी वर्षानुवर्षे एकाच विभागात ठाण मांडून असल्याची चर्चा महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यामध्येच ऐकायला मिळते. त्यांची बदली आता तरी होईल का? की केवळ बदलीचा ‘फार्स’ कागदोपत्री केला जाणार? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कारण, एप्रिल व मे २०२३ मध्ये बदलीस पात्र ठरणारांची माहिती २८ फेब्रुवारीपर्यंत संबंधित विभाग प्रमुखांकडून प्रशासन विभागाने मागितली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिका सेवेतील वर्ग अ ते ड पर्यंतच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसंदर्भात २०१५ मध्ये धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार एप्रिल व मे महिन्यात बदल्यांसाठी पात्र ठरणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी संबंधित विभाग प्रमुखांकडून मागितली आहे.

बदलीचे निकष
एकाकी संवर्ग व अन्य विभागात बदली करता येत नाही, असे वर्ग ‘अ’ आणि ‘ब’ संवर्गातील अधिकारी व कर्मचारी वगळून ज्यांना एकाच विभागात तीन वर्ष झाली आहेत; ‘क’ संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी एकाच विभागात काम करण्याचा कालावधी सहा वर्षांचा असला तरी, त्यांच्याकडील कामकाज विभागांतर्गत बदलावे, असे बदलीबाबतचे निकष आहेत. तसेच, वैयक्तिक व वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असल्यांलाकडूनही २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविले आहेत.