Tue, March 28, 2023

‘वायसीएम मधील एक्सरे मशीन सुरू करा’
‘वायसीएम मधील एक्सरे मशीन सुरू करा’
Published on : 13 February 2023, 2:57 am
पिंपरी, ता. १३ : महापालिकेच्यावतीने नागरिकांच्या वैद्यकीय उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय सुरू केले आहे. परंतु यातील एक्सरे मशिन मागील महिन्यापासून बंद आहे. मशिन त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी आपचे प्रशासकीय प्रमुख यल्लापा वाळदोर यांनी केली आहे.
वायसीएमचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना निवेदन दिले आहे. एक्सरे मशिन बंद असल्याने रुग्णांचे व नातेवाइकांचे हाल होत आहेत. तसेच त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील अद्ययावत एक्सरे मशिन त्वरित दुरुस्त करावे, अशी मागणी केली आहे. वाबळे यांनी लवकरात लवकर मशिन दुरुस्त करण्यात येईल, असे आश्वासन दिले असल्याचे वालदोर यांनी सांगितले.