निगडीतील टिळक चौकाचा श्वास गुदमरतोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीतील टिळक चौकाचा श्वास गुदमरतोय
निगडीतील टिळक चौकाचा श्वास गुदमरतोय

निगडीतील टिळक चौकाचा श्वास गुदमरतोय

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ : निगडीतील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात वाहतूक कोंडीचा बट्ट्याबोळ झाला आहे. सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीने नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. या वाहतूक कोंडीवर रस्ते वाहतूक पोलिसांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे.
लोकमान्य टिळक चौकातील वाहतूक कोंडीवर त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे. परिसरातील कार्यकर्ते व युवकांनी अनेकदा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना वाहतूक कोंडी मार्गी लावण्यासाठी निवेदने दिली आहेत. मात्र, त्यावर कसलीच कार्यवाही होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. वाहतूक कोंडी ही नित्याचीच समस्या बनली आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे मोठी औद्योगिक वसाहत असून, याच चौकातून तळवडे, चाकण औद्योगिक वसाहतीकडे हे रस्ते जातात.

‘‘वाढते औद्योगिकीकरण आणि बेशिस्त वाहन चालक आणि नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडीत मोठी भर पडत आहेत. शहरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी, या मागणीचे निवेदन वाहतूक शाखेचे पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आहे. पोलिस प्रशासनाने यावर उपाययोजना करावी.’’
- शिवानंद चौगुले, सामाजिक कार्यकर्ते, महात्मा फुलेंनगर-चिंचवड