खासदार बारणे वाढदिवसानिमित्त २० जणांना पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खासदार बारणे वाढदिवसानिमित्त २० जणांना  पुरस्कार जाहीर
खासदार बारणे वाढदिवसानिमित्त २० जणांना पुरस्कार जाहीर

खासदार बारणे वाढदिवसानिमित्त २० जणांना पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ ः खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील २० जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात १६ फेब्रुवारीला वितरण सोहळा होणार आहे. याशिवाय आयोजित विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे, अशी माहिती श्रीरंगआप्पा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी बारणे, उपाध्यक्ष रवी नामदे, सचिव बशीर सुतार यांनी पत्रकाद्वारे दिली.

पुरस्कारर्थी असे ः अमित गोरखे (शिक्षण), मुकुंद कुचेकर (समाज), डॉ. पं. नंदकिशोर कपोते (कला गौरव), सूर्यकांत मूथियान (पर्यावरण), वसंत काटे (उद्योग), माया रणवरे (दुर्गा), डॉ. नारायण सुरवसे (सेवा), प्रा. सुनीता नवले (दुर्गा), विजयन (शिक्षण), शेखर कुटे (वारकरी), संगीता तरडे (दुर्गा), अमरसिंह निकम (आरोग्य), वृषाली मरळ (आधार), संतोष कणसे (श्रमिक), आलम शेख, भगवान मुळे (समाज), जयदेव म्हमाणे (क्रीडा), प्रमोद शिवतरे (समाज), अनिल साळुंखे (समाज) आणि शुभंकर को-हौसिंग सोसायटी ( आदर्श).

वाढदिवसानिमित्त १५ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत विविध संस्था, संघटना व कार्यकर्त्यांच्या वतीने फिजिओथेरपी शिबिर, आरोग्य तपासणी, रोगनिदान शस्त्रक्रिया शिबिर, नेत्र तपासणी, चष्मा वाटप शिबिर, दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा छकडी स्पर्धा, महाराष्ट्र श्री शरीरसौष्ठव स्पर्धा होत आहेत. याशिवाय १५ तारखेला तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समिती, शिवसेनेच्या वतीने आणि १६ तारखेला प्रा. मोरे प्रेक्षागृहात खासदार बारणे यांचा अभीष्टचिंतन सोहळा होणार आहे.