किकबॉक्सिंग स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे घवघवीत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किकबॉक्सिंग स्पोर्ट्सच्या 
खेळाडूंचे घवघवीत यश
किकबॉक्सिंग स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे घवघवीत यश

किकबॉक्सिंग स्पोर्ट्सच्या खेळाडूंचे घवघवीत यश

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन ११ ते १३ फेब्रुवारी २०२३ दरम्यान श्रीक्षेत्र शिर्डी, अहमदनगर येथे करण्यात आले होते. स्पर्धेत किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड शहर संघाच्या ३७ खेळाडूंनी ३१ सुवर्णपदके, १६ रौप्यपदके आणि १२ कांस्यपदकांसह स्पर्धेचे सांघिक उपविजेतेपद पटकावीत घवघवीत यश मिळविले.
स्पर्धेत विविध जिल्ह्यातील ७०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. पिंपरी-चिंचवड किकबॉक्सिंग संघाच्या खेळाडूंनी सदर स्पर्धेत म्युझिकल फॉर्म, पॉइंट फाईट, लाइट कॉन्टॅक्ट किक लाइट, फूल कॉन्टॅक्ट, लो-किक, के-१ अशा सातही क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले.
स्पर्धेत खेळाडूंनी संपादन केलेल्या घवघवीत यशामुळे संपूर्ण शहरातून सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विजयी खेळाडूंचे किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे विद्यमान अध्यक्ष नीलेश शेलार, सचिव धीरज वाघमारे, पिंपरी-चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशनचे आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग पंच इक्बाल शेख, सचिन बनसोडे यांनी पंच म्हणून काम पाहिले. सर्व विजयी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग प्रशिक्षक सागर बनसोडे, मेघा गावडे, यश वाल्हेकर यांचे मार्गदर्शन लाभले.