मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदार चिठ्ठ्यांचे
घरोघरी वाटप
मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी वाटप

मतदार चिठ्ठ्यांचे घरोघरी वाटप

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानाच्या अनुषंगाने मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटण्यात येत आहेत. बुधवारपर्यंत एक लाख ८६ हजार स्लीप वाटप केल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. पोटनिवडणुकीसाठी ५१० बीएलओ (केंद्र अधिकारी) व ८४ नोडल अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना घरपोच व्होटर स्लीप वाटप केल्या जात आहेत. तसेच मतदान केंद्र कुठे आहे, याबाबतची माहिती मतदारांना दिली जात आहे. सुमारे पाच लाख ६८ हजार व्होटर स्लीप वाटण्याचे नियोजन असून २० फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असून सर्व केंद्रांवर दिव्यांग, ज्येष्ठ व शारीरिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींसाठी स्वतंत्र सुविधा असेल. त्यांना मतदान केंद्रापर्यंत येणे व परत जाणे यासाठी स्वयंसेवक मदत करतील, असेही ढोले यांनी सांगितले.


पोटनिवडणुकीसाठी
२,९०७ मतदान यंत्रे
पिंपरी, ता. १५ ः चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान यंत्रे तयार करण्याची (कमिशनिंग) प्रक्रिया बुधवारी निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत सुरू झाली. यात ७१४ कंट्रोल युनिट, एक हजार ४२८ बॅलेट युनिट आणि ७६५ व्हीव्हीपॅट अशा दोन हजार ९०७ मतदान यंत्रांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली. थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवनातील स्ट्राँग रूममध्ये मतदान यंत्रे ठेवली आहेत. त्यांची पाहणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केली. सुरक्षिततेबाबत सूचना दिल्या. मतदान केंद्र क्रमांक ६१ च्या सर्व कमिशनिंग प्रक्रियेची तपासणी करून ईव्हीएम सिलिंग केले. दरम्यान, दिव्यांगांसाठीच्या बॅलेट युनिटवरील ब्रेल लिपी व दिशादर्शक स्टिकरची माहिती भोसरीतील पताशीबाई मानव कल्याण अंधशाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग साळुंखे यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिली.
--