पालिका अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिका अभ्यासिकेतील
विद्यार्थ्यांचा सत्कार
पालिका अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

पालिका अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १५ ः महाट्रान्स्को, डीआरडीओ, रेल्वे विभागाच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार महापालिकेतर्फे क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे यांनी केला. महापालिकेच्या छत्रपती संभाजीनगर येथील साई उद्यानातील भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम स्पर्धा परीक्षा केंद्रात विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. यात डीआरडीओ संस्थेत सीनियर टेक्निकल असिस्टंट पदावर नियुक्त दत्तात्रय ढवळे; महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियर पदावर नियुक्त बालाजी कांबळे, विद्याधर शिंदे; महाराष्ट्र रेल्वे ग्रुप डी पदावर नियुक्त विशाल हंडरगुळे यांचा समावेश होता. ग्रंथपाल राजू मोहन, प्रफुल्ल पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. मयूरेश निघोज व नीलम गाढवे यांनी सूत्रसंचालन केले.
---