
कर्ज मंजुरीसाठी बनावट कागदपत्रे सादर करून बँकेची फसवणूक
पिंपरी, ता. १६ : कर्ज मंजुरीसाठी बँकेत बनावट कागदपत्रे सादर कर्ज घेतले. यामध्ये बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार काळेवाडीतील लाला अर्बन को ऑप. बँक ली. नारायणगाव, बँकेच्या काळेवाडी शाखेत घडला.
महेश सुभाष गाते (वय ३९, रा. सिद्धी निसर्ग हाउसिंग सोसायटी, विनोदे वस्ती, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. शाखाधिकारी महेंद्र बाबूराव आवटे (रा. आनंदवाडी, नारायणगाव, जुन्नर) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपीच्या फ्लॅटवर पूर्वी ऍक्सिस बँकेचे कर्ज असताना त्याने तशीच बनावट कागदपत्रे तयार करून ती खोटी कागदपत्रे कर्ज मंजुरीसाठी लाला अर्बन को ऑप बँक ली. नारायणगाव, काळेवाडी शाखेत सादर केली. त्या फ्लॅटवर लाला अर्बन बँकेचे ४० लाखांचे कर्ज घेतले. अद्यापपर्यंत त्याची परतफेड केली नाही. पूर्वीच्या कर्जाची परतफेड न केल्याने ऍक्सिस बँकेने त्या फ्लॅटचा पूर्वीच ताबा घेतल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने लाला अर्बन बँकेचा विश्वासघात करीत या रकमेचा अपहार करून फसवणूक केली.