महाशिवरात्रीनिमित्त घोराडेश्वरला जादा बसगाड्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाशिवरात्रीनिमित्त
 घोराडेश्वरला जादा बसगाड्या
महाशिवरात्रीनिमित्त घोराडेश्वरला जादा बसगाड्या

महाशिवरात्रीनिमित्त घोराडेश्वरला जादा बसगाड्या

sakal_logo
By

पिंपरी, ता. १६ : महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या सोयीसाठी शनिवारी (ता. १८) पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून महत्त्वाच्या बसस्थानकांवरून बसगाड्यांचे नियोजन करण्यात केले आहे. शहरातून तसेच उपनगरातून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने जादा बस गाड्या सोडण्यात आल्या आहेत.
निगडी (पवळे चौक) येथून घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) येथे जाण्यासाठी पहिली फेरी पहाटे ०५. २० मिनिटांनी असून, या ठिकाणी जाण्याकरीता पर्यायी बसमार्ग क्रमांक २२८-कात्रज ते वडगाव मावळ, बसमार्ग क्रमांक ३०५-निगडी पवळे चौक ते वडगाव मावळ व बसमार्ग क्रमांक ३६८-निगडी ते लोणावळा मार्गे कामशेत या तीन मार्गांवर एकूण २२ बसगाड्या सरासरी १० ते १५ मिनिटे वारंवारितेने उपलब्ध करून दिल्या आहेत. तीनही बसस्थानकांवरून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन परिवहन महामंडळामार्फत करण्यात येत आहे.