ॲम्युनिशन फॅक्टरी, बजाज ऑटो विजयी औद्योगिक क्रीडा संघटनेने आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲम्युनिशन फॅक्टरी, बजाज ऑटो विजयी 
औद्योगिक क्रीडा संघटनेने आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा
ॲम्युनिशन फॅक्टरी, बजाज ऑटो विजयी औद्योगिक क्रीडा संघटनेने आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा

ॲम्युनिशन फॅक्टरी, बजाज ऑटो विजयी औद्योगिक क्रीडा संघटनेने आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ ः औद्योगिक क्रीडा संघटनेच्या मर्यादित २० षटकांच्या बाद फेरीच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी, ॲम्युनिशन फॅक्टरी, खडकी व बजाज ऑटो, चाकण यांनी अनुक्रमे फॉरेशिया व फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स यांच्यावर विजय मिळविला. टाटा मोटर्स क्रीडांगणावर हे सामने झाले.
ॲम्युनेशन फॅक्टरी, खडकी व फॉरेशिया यांच्यातील सामना फार अटीतटीचा झाला. शेवटच्या चेंडूवर तीन धावा विजयासाठी पाहिजे असताना ॲम्युनिशन फॅक्टरीच्या फलंदाजाने षटकार मारून विजय साजरा केला. फॉरेशियाच्या खेळाडूंनी फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत ॲम्युनिशन फॅक्टरीच्या फलंदाजांना मुक्त फलंदाजीपासून रोखून धरले होते पण शेवटी ॲम्युनिशन फॅक्टरी विजयी झाली.

फॉरेशिया ५ बाद १५१, दत्ता पाटील ३१, निरंजन भोसले ४८, रूपेश साळुंखे ३०, अक्षय येवते २६, प्रतीक गौतम ३१/२.

ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी ७ बाद १५५, संजय सूर्यवंशी ३५, अमित वेदपाठक २४, प्रतीक गौतम २०, यशोधन गोरे २४, सचिन सरवान २७, रूपेश साळुंखे ३६/३, विशाल पाटील २०/३.

ॲम्युनिशन फॅक्टरी तीन गडी राखून विजयी झाली. या सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’चे पारितोषिक फॉरेशियाच्या निरंजन भोसले याला हिंडाल्कोचे माजी अधिकारी रवींद्र कदम यांच्या हस्ते देण्यात आले.
दुपारच्या सत्रामध्ये टाटा मोटर्सच्या क्रीडांगणावर झालेल्या सामन्यात बजाज ऑटो, चाकण संघाने प्रथम फलंदाजी करीत सर्व बाद ११९ धावा केल्या व फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स पुढे माफक आव्हान ठेवले. फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स संघाने उत्तरादाखल सर्व बाद ७७ धावा केल्या. बजाज ऑटो, चाकण ४२ धावांनी विजयी झाली.

बजाज ऑटो, चाकण सर्व बाद ११९ धावा. सागर बेलदार ४३, सतीश जाधव १८, कृष्णा११/३, प्रशांत सातपुते ३३/३.

फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स सर्व बाद ७७ धावा. सोमनाथ आडागळे २३, अनिकेत पवार २४, अजय गोधडे १३/३, अमोल बेडगे १७/३.

या सामन्याचे ‘मॅन ऑफ द मॅच’चे पारितोषिक बजाज ऑटो, चाकणच्या सागर बेलदार याला जितेंद्र राणा प्लांट हेड, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे प्रमोद उत्तुरे (मॅनेजर,एच्आर व ॲडमिन),अशोक त्यागी (सीनियर मॅनेजर),अतुल तोताडे (मॅनेजर), अनिल दोड्डामनी(अकाउंट्स मॅनेजर), औद्योगिक क्रीडा संघटनेचे नरेंद्र कदम, हरी देशपांडे, विजय हिंगे व प्रदीप वाघ उपस्थित होते.

या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने २० फेब्रुवारीला टाटा मोटर्सच्या क्रीडांगणावर खेळले जातील.