स्मृतिरंग प्रदर्शनास डॉ. कुलकर्णी यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्मृतिरंग प्रदर्शनास 
डॉ. कुलकर्णी यांची भेट
स्मृतिरंग प्रदर्शनास डॉ. कुलकर्णी यांची भेट

स्मृतिरंग प्रदर्शनास डॉ. कुलकर्णी यांची भेट

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : संस्कार भारती पिंपरी-चिंचवड समिती आयोजित स्मृतिरंग कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नुकतेच ज्येष्ठ साहित्यिका, एस. एल. भैरप्पा यांच्या आणि कन्नड साहित्याच्या अनुवादक व अभ्यासिका डॉ. उमा कुलकर्णी यांनी नुकतेच पु. ना. गाडगीळ अँड सन्स चिंचवड येथील कलादालनातील प्रदर्शनाला भेट दिली.
या वेळी त्यांच्यासोबत अखिल भारतीय साहित्य विधा समिती सदस्या डॉ. नयना कासखेडीकर, सह संयोजिका सुषमा हिरेकेरूर, अध्यक्ष सचिन काळभोर, सचिव लीना आढाव उपस्थित होते. या वेळी डॉ. कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. प्रफुल्ल भिष्णूरकर, ज्येष्ठ चित्रकार रामा घारे, लीना आढाव यांच्या चित्रातली विविधता, रंगसंगती, निवडलेले विषय, कलाकृती करत असताना वापरलेली विविधता यावर त्यांनी मार्गदर्शन केले.