Sun, March 26, 2023

शिवजयंती उत्साहात साजरी
शिवजयंती उत्साहात साजरी
Published on : 19 February 2023, 12:33 pm
आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती. त्यानिमित्ताने शिवप्रेमींनी भगवे ध्वज हातात घेऊन, भगव्या रंगाचे फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात भक्ती-शक्ती, निगडी येथे शिवरायांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या वेळी ‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवरायांबद्दलचे प्रेम, आदर आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मिरवणुकीत गर्दी करताना दिसत होते. अनेक लहान मुलांनी शिवरायांच्या तसेच लहान मुलींनी जिजाबाईंची वेशभूषा केलेली दिसत होती. एकूणच शहराचे वातावरण भगवे झालेले आढळून आले.