शहरातील पवना नदीच्या पाण्यावर फेस महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरातील पवना नदीच्या पाण्यावर फेस  
महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष
शहरातील पवना नदीच्या पाण्यावर फेस महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

शहरातील पवना नदीच्या पाण्यावर फेस महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : शहरातील पवना नदी थेरगाव घाटालगत पूर्णपणे फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाण्याने नदी प्रदूषित झाल्याने मध्यंतरी केजुबाई बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच सापडल्याने खळबळ उडाली होती. सध्या या पाणी फेसाळल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले असून, नदीप्रदूषणाच्या चिंतेत भर पडली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची जीवनदायिनी असलेली पवना नदी काही समाज कंटकांनी प्रदूषित करण्याचा विडा उचलला आहे. कंपन्यांच्या रसायनमिश्रित पाण्यामुळे नदी मृत होत चालली आहे. परंतु, या कंपन्यांना आवर घालण्यासाठी वाली उरला आहे की नाही असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी केला आहे. केजुबाई बंधाऱ्यापासून ते मोरया गोसावी मंदिरापर्यंत सध्या मोठ्या प्रमाणात नदी पांढऱ्या रंगाने फेसाळली आहे. हा फेस पाण्यावर तरंगत आहे. फेस उगमापासून आहे की, मध्येच कुठे मिश्रित आहे याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगली आहे. नियमितपणे शनिवारी व रविवारी हा प्रकार सर्रास घडत असूनही महापालिका प्रशासन व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाई होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जलपर्णीमुळे माशांना आॅक्सिजन मिळेना
थेरगाव येथील केजुबाई धरणात लाखो माशांचा मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला होता. पवना नदीपात्रात रसायनयुक्त आणि मानवी मैला पाणी सर्रास सोडलं जातं. नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी असून, दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही, पवना नदी पत्रातील जलपर्णी ‘जैसे थे’च राहते. जलपर्णी असल्याने पाण्यातील माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. त्यामुळे, नदी असंख्य समस्यांनी वेढलेली आहे. त्यामुळे, नदी पुर्नजिवित करण्यासाठी कोणाचेही प्रयत्न दिसून येत नाही.
फोटोः 25848