
बंजारा सेवा संघातर्फे मंदिराला जागेची मागणी
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. २२ : बंजारा समाजाचा मोठा वर्ग मावळ तालुक्यात राहत असूनही, समाजासाठी आतापर्यंत एकही समाजभवन नाही, खंत व्यक्त करीत समाजातील नागरिकांनी समाजभवन व संतगुरू सेवालाल महाराजांच्या मंदिरासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संतगुरु सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी ही मागणी करण्यात आली. समाजाचे सांस्कृतिक वैभव टिकून राहावे, विविध उपक्रमांसाठी हक्काची जागा मिळावी, यासाठी समाजभवनसाठी जागा मिळावी. सेवालाल महाराजांची जयंती सार्वजनिक सुटी जाहीर करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात बंजारा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, नगराध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे. बंजारा सेवा संघ मावळचे संस्थापक हिरा जाधव, अध्यक्ष महादेव राठोड, बंजारा क्रांती दल महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष देविदास राठोड, बंजारा क्रांती दलचे पुणे अध्यक्ष अर्जुन आढे, रामभाऊ राठोड, आशुतोष राठोड, बाळासाहेब काशीद, नितीन मराठे, नगरसेवक अमोल शेटे, संतोष भेगडे, कल्पेश भगत, सुरेश कडू, संदीप लोहार, विनायक जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन जतिन पांडे यांनी केले. आभार हिरा जाधव यांनी मानले.
tas-20-2-23-P1-
तळेगाव दाभाडे (स्टेशन) : संतगुरू सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित समाज बांधव.