आठ पदाधिकाऱ्यांची
पक्षातून हकालपट्टी
शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कारवाई

आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून कारवाई

Published on

पिंपरी, ता. २० : चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आठ पदाधिकाऱ्यांची
पक्षाच्या आदेशाविरोधात काम करत असल्यामुळे हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. गौतम चाबुकस्वार व पिंपरी चिंचवड शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी सोमवारी (ता. २०) दिली.
पक्षाच्या महिला विभागाच्या चिंचवड विधानसभा संघटिका अनिता तुतारे, शहर संघटिका रजनी वाघ, विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहर प्रमुख नवनाथ तरस, विभागप्रमुख प्रशांत तरवटे, विभागप्रमुख हनुमंत पिसाळ, पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर व रवी घटकर यांच्यावर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली आहे, असे चाबुकस्वार व भोसले यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे यांना पाठिंबा असला तरी पक्षाचे अनेक पदाधिकारी अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे पक्षाने हकालपट्टीच्या कारवाईचे शस्त्र उगारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांना महाविकास आघाडीतील घटक या नात्याने शिवसेनेचा पाठिंबा आहे. परंतु; काही पदाधिकारी पक्ष आदेशाविरोधात काम करत असल्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे.
- ॲड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com