अधिवेशनासाठी चार अधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अधिवेशनासाठी
चार अधिकारी
अधिवेशनासाठी चार अधिकारी

अधिवेशनासाठी चार अधिकारी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २१ ः राज्य विधीमंडळाचे २०२३ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून (ता. २७) सुरू होत आहे. त्यात तारांकित व अतारांकित प्रश्न, लक्षवेधी सूचना, स्थगन प्रस्ताव यांसह अन्य प्रश्न विधीमंडळ सचिवालयाकडून महापालिकेस प्राप्त होतात. त्यासाठी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी प्रशासकीय व अभियांत्रिकी कामकाजासाठी प्रत्येकी एक समन्वय व एक सहायक समन्वय अधिकारी असे चार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. यात अनुक्रमे उपायुक्त चंद्रकांत इंदलकर व सहायक आयुक्त वामन नेमाणे आणि शहर अभियंता मकरंद निकम व उपअभियंता देवेंद्र बोरावके यांचा समावेश आहे.
--