गुरु गणेश विद्यालयात शिवजयंती उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुरु गणेश विद्यालयात
शिवजयंती उत्साहात
गुरु गणेश विद्यालयात शिवजयंती उत्साहात

गुरु गणेश विद्यालयात शिवजयंती उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ : गुरु गणेश विद्यालयात शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन, शिवगर्जना व शिवपाळण्याने करण्यात आली. या वेळी सचिव राजेंद्र कांकरिया, शंकरलाल मुथा यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. शिवव्याख्याते शुभम मोटे यांनी शिवचरित्र, रयतेवर होणारे अन्याय व स्वराज्य स्थापना या विषयावर शिवव्याख्यान दिले. एच. एन. मारकड यांनी शिवाजी महाराजांचा इतिहास यावर विचार मांडले. एच. एस. लोखंडे यांनी प्रास्ताविक केले. नृत्य, गडकिल्ले संवर्धन व नाटिका व लेझीम आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. जिजाऊ, शिवाजी महाराज व मावळे यांच्या मनमोहक वेशभूषा मुलांनी केल्या. एम.एल तोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धी भोसले हिने लाठीकाठी प्रात्यक्षिके सादर केले. एल.डी. थोरात यांनी आभार व्यक्त केले. नियोजन आर.एच. भिसे यांनी केले.