Wed, March 22, 2023

महिलेच्या घरात शिरून
विनयभंग व मारहाण
महिलेच्या घरात शिरून विनयभंग व मारहाण
Published on : 22 February 2023, 8:09 am
पिंपरी, ता. २२ : महिलेच्या घरात शिरून तिच्याशी गैरवर्तन करीत विनयभंग केला. महिलेला मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी महिलेचे वडील आले असता त्यांनाही मारहाण केली. ही घटना चाकणमधील नाणेकरवाडी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी विजय मोहन राठोड (वय ३२, रा. खराबवाडी, चाकण) याला अटक केली आहे. पीडित महिलेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरात जबरदस्तीने आला. महिलेसोबत गैरवर्तन करीत त्याने विनयभंग केला. महिलेने त्यास विरोध केला असता त्याने महिलेला दगडाने मारून जखमी केले. दरम्यान, हे भांडण सोडविण्यासाठी महिलेचे वडील आले असता त्यांनाही रॉडने मारून जखमी केले. तसेच घरातील सामान ढकलून देत नुकसान केले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.