प्रमोद कुटे, काळभोर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमोद कुटे, काळभोर यांचा 
शिवसेनेमध्ये प्रवेश
प्रमोद कुटे, काळभोर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

प्रमोद कुटे, काळभोर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. २२ ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, महिला संघटिका ऊर्मिला काळभोर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले.
भाजप महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत मुख्यमंत्र्यांची सभा झाली. शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते.
आकुर्डी भागातून प्रमोद कुटे निवडून आले होते. स्मार्ट सिटीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, विभागप्रमुख फारुक शेख, मंगेश कुटे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.