एका केंद्रावर सरासरी १,११६ मतदार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एका केंद्रावर सरासरी १,११६ मतदार
एका केंद्रावर सरासरी १,११६ मतदार

एका केंद्रावर सरासरी १,११६ मतदार

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी (ता. २६) ५१० केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी सात ते सायंकाळी सहा अशी मतदानाची वेळ आहे. मतदान प्रक्रियेसाठी तीन अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतदारसंघात पाच लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. सर्वाधिक एक हजार ५१३ मतदार रावेत येथील सिटी प्राइड स्कूलमधील केंद्र क्रमांक २६ येथे असून, येथीलच केंद्र क्रमांक ३३ येथे सर्वात कमी २६४ मतदार आहेत. एका केंद्रावर सरासरी एक हजार ११६ मतदार आहेत. मतदानाची वेळ संपल्यानंतर अर्थात सायंकाळी सहापासून मतदान यंत्र व अन्य साहित्य मतदान केंद्र अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून स्वीकृत केले जाणार आहे. थेरगाव येथील शंकरअण्णा गावडे कामगार भवनात मतदानयंत्र ठेवण्यात येणार असून तिथेच गुरुवारी (ता. २) मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.

असे आहे मतदानाचे नियोजन
- निवडणूक कामकाजासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध कामे सोपविली आहेत
- मतदान केंद्रावर आवश्यक निवडणूक साहित्य वाटपासाठी स्वतंत्र पथके तयार केली होती
- मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर थेरगाव येथील गावडे कामगार भवनात साहित्य जमा करणार
- मतदान साहित्य वाटप व स्वीकृतीसाठी स्वतंत्र नियंत्रण पथक नियुक्त केले आहे
- कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी साहित्य वितरण ठिकाणी वाहतूक व्यवस्थेचा तपशील दर्शनी भागात
- मतदानाच्या दिवशी पोलिस बंदोबस्त वाढविला असून, यंत्रणा सज्ज

मतदान साहित्य वाटप नियोजन
- सकाळपासून २६ टेबलद्वारे मतदान केंद्रनिहाय साहित्य वाटप
- नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांची हजेरी
- मतदान साहित्य केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांच्या ताब्यात
- साहित्य दिल्याची नोंद साहित्य वाटप रजिस्टरमध्ये
- मतदान साहित्यासह नेमून दिलेल्या केंद्रावर जाण्यासाठी बस सुविधा
- अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली कामासाठी ५१ पथके राखीव

मनुष्यबळ
साहित्य वाटपासाठी कर्मचारी ः १११
साहित्य स्वीकृतीसाठी कर्मचारी ः १४८
मतदान अधिकारी, कर्मचारी ः ३,०००
बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी ः ३७०७
बंदोबस्तासाठी पोलिस अधिकारी ः ७२५

मतदार व मतदान केंद्र
एकूण ः ५,६८,९५४
पुरुष ः ३,०२,९४६
महिला ः २,६५,९७४
तृतीयपंथी ः ३४
मतदान केंद्र ः ५१०

सर्वाधिक, सर्वात कमी मतदान केंद्र
सर्वाधिक रावेत सिटी प्राइड स्कूल केंद्र क्रमांक २६ ः १,५१३
सर्वात कमी रावेत सिटी प्राइड स्कूल केंद्र क्रमांक ३३ ः २६४
एक हजारापेक्षा अधिक मतदार असलेले एकूण केंद्र ः ३४१
एक हजारापेक्षा कमी मतदार असलेले एकूण केंद्र ः १६९
एका केंद्रावर सरासरी मतदार संख्या ः १,११६

अशी होती वाहतूक व्यवस्था
पीएमपी ः १०२
मिनीबस ः ८

जीप ः १२
एकूण वाहने ः १२२

मतदान केंद्रनिहाय साहित्य
मतदान केंद्रनिहाय केंद्राध्यक्ष व सहायक मतदान केंद्राध्यक्षांकडे दिलेल्या साहित्यात ईव्हीएम म्हणजेच बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र, आवश्यक साहित्य, मतदान प्रक्रीयेविषयीचे विविध पाकिटे आणि लिफाफे आदींचा समावेश होता.

टपाली मतदानाची सुविधा
मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांपैकी २४८ कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठी फॉर्म वाटप केले होते. त्यांच्यासाठी साहित्य वितरण ठिकाणी टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून दिली होती. पहिल्या व दुसऱ्या प्रशिक्षणादरम्यान या कर्मचाऱ्यांना टपाली मतदानासाठीचे अर्ज दिले होते. त्यानुसार काही कर्मचाऱ्यांनी आज मतदानाचा हक्क बजावला.

थेरगावमध्ये सखी मतदान केंद्र
थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयांमध्ये १९५ क्रमांकाचे मतदान केंद्र ‘सखी मतदान केंद्र’ म्हणून तयार केले आहे. तिथे अधिकारी व कर्मचारी महिला आहेत. त्या केंद्राची विशेष रचना केली आहे.

रावेत व वाकडला आदर्श केंद्र
रावेत येथील बबनराव भोंडवे शाळेमधील २३ क्रमांकाचे केंद्र, वाकड येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील ३९५ आणि ४०५ क्रमांकाचे केंद्र आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग स्टेशन) म्हणून तयार केले आहे.

मतदार मदत क्रमांक ः ०२०-२६१३७२३३
जिल्हाधिकारी कार्यालयातील बी विंगमधील पहिल्या मजल्यावर उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक-एक यांच्या कार्यालयात मतदार मदत केंद्र व तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. मदत कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१३७२३३ असून ईमेल mla.election123@gmail.com आहे, असे उपजिल्हाधिकारी, भूसंपादन तथा नोडल अधिकारी प्रवीण साळुंके यांनी कळविले आहे.

हेल्पलाइन
सचिन ढोले, निवडणूक निर्णय अधिकारी ः ९९३०३८८२७७
अजित पाटील, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ः ९६३७५६८८४४
शिरीष पोरेडी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ः ९९२२५०१७४०
शीतल वाकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ः ९४२२३२०६९७

प्रत्येक केंद्राच्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहे. पोटनिवडणूक मतदानाच्या अनुषंगाने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा संविधानिक अधिकार बजवावा.
- सचिन ढोले, निवडणूक निर्णय अधिकारी, चिंचवड विधानसभा

(बातमीत बातमी वापरावी)
मतदान प्रक्रियेबाबत प्रशिक्षण
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, सहायक अशा सुमारे तीन हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक निरीक्षक एस. सत्यनारायण यांच्या उपस्थितीत महापालिका उपआयुक्त विठ्ठल जोशी आणि निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी शनिवारी (ता. २५) प्रशिक्षण दिले.
थेरगाव येथील शंकरआण्णा गावडे कामगार भवनात आयोजित प्रशिक्षण सत्रामध्ये मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष करावयाच्या कामकाजाबाबत आणि साहित्य वितरणापूर्वी कर्मचाऱ्यांना विहित नमुन्यातील माहिती भरताना घ्यावयाची काळजी, ईव्हीएम यंत्रातील तांत्रिक अडचणी कशा दूर कराव्यात, साहित्य स्वीकारताना व जमा करताना काय काळजी घ्यावी याबाबत सविस्तर प्रशिक्षण दिले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील, शिरीष पोरेडी, शीतल वाकडे, निवडणूक सहायक अधिकारी नागेश गायकवाड, माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी किरण गायकवाड, निवडणूक सहायक अधिकारी प्रशांत शिंपी, थॉमस नरोन्हा, ईव्हीएम यंत्र व्यवस्थापन कक्षाचे समन्वयक बापू गायकवाड, पोस्टल मतदान कक्षाचे समन्वयक राजेश आगळे, समन्वयक सीताराम बहुरे, भेल इलेक्ट्रॉनिक्सचे तज्ज्ञ अधिकारी उपस्थित होते. प्रशिक्षणानंतर मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या निवडणूक साहित्याचे केंद्रनिहाय वाटप करण्यात आले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य रविवारी (ता. २६) सायंकाळी सहापासून जमा करून घेतले जाणार आहे. या अनुषंगाने कर्तव्ये, जबाबदारी आणि आवश्यक कामकाज याबद्दल प्रशिक्षणामध्ये सविस्तर माहिती आणि सूचना केल्या.