Sat, April 1, 2023

एशिया टेक सेंटरच्या
शिबिरात ११५ जणांचा सहभाग
एशिया टेक सेंटरच्या शिबिरात ११५ जणांचा सहभाग
Published on : 26 February 2023, 9:43 am
पिंपरी, ता. २६ : एशिया टेक सेंटर प्रा. लिमिटेड संस्थेमार्फत ओम ब्लड बँक यांच्यावतीने सलग तिसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात ११५ लोकांनी सहभाग नोंदवला. यावेळी ७५ युनिट रक्त संकलित झाले. शिवाजी महाराजांच्या विचाराचा प्रसार व्हावा या भावनेतून ‘तुम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून कुठले गुण घेतले आणि स्वतःच्या जीवनात काय अमलात आणले.’ या विषयावर भाषण स्पर्धा आणि शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात ५२ लोकांनी सहभाग नोंदवला.