
आयटी कर्मचारांचा चांगला प्रतिसाद
पिंपरी, ता. २६ : रविवार असल्याने आयटी क्षेत्रातील कर्मचारी मतदानासाठी येतील की नाही? अशी शंका होती. पिंपळे सौदागर, वाकड, रहाटणी या भागात त्यांचा मोठा उत्साह दिसून आला. यामुळे उमेदवारांनी सुस्कारा सोडला. मतदानानंतर तशा सोशल मीडियावर पोस्ट करून इतरांनाही मतदानासाठी प्रोत्साहित केले आहे.
--
कन्या शाळा, खिंवसरा पाटील विद्यालय, थेरगाव या ठिकाणी मतदान केले. मी मूळचा केरळचा आहे. मी योग्य उमेदवाराला मतदान केले. गुन्हेगारांवरही वचक बसावा यासाठी मी अनेकदा उमेदवारांसोबत चर्चा केली आहे. शहराचे चित्र पालटेल, अशी अपेक्षा आहे.
- अमित कुबेर, थेरगाव
--
मी पिंपळे सौदागरमधील पी.के इंटरनॅशनल शाळेत मतदान केले. विकासकामांत बदल होणे अपेक्षित आहे. पाण्याची टंचाई व वाहतूक कोंडी ही अडचण दूर व्हावी, हा मतदान करण्यामागचा हेतू होता. नवा आमदार नक्कीच या अडचणी सोडवतील ही अपेक्षा आहे.
्- ऋषिकेश भोसले, पिंपळे सौदागर
--
पुनावळेतील मनपा शाळा येथे मतदान केले. शहरात मूलभूत गरजा उत्कृष्ट आहेत. परंतु, आयटी कर्मचाऱ्यांना भेडसावणारी वाहतूक कोंडी सुटावी व ट्रान्स्पोर्टेशन चांगले मिळावे. हा माझा मतदान करण्याचा हेतू होता.
- शुभांगी मोरे, पुनावळे
--
रहाटणीतील प्राथमिक शाळा क्रमांक ५५ येथे मतदान केले. ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या प्रकारे सहकार्य केले जात होते. मतदानावेळी प्रत्येक दक्षता घेतली जात होती. हे कौतुकास्पद आहे.
- भालचंद्र बलशेटवार, रहाटणी
--
कांतिलाल खिंवसरा विद्यालय, थेरगाव या ठिकाणी आम्ही पती-पत्नीने मतदान केले आहे. आम्हाला चांगले रस्ते, पिण्याचे मुबलक पाणी व महिलांसाठी सुरक्षितता अधिक प्रमाणात मिळावा या अपेक्षेने मतदान केले. आयटी पार्कमध्ये आजही ट्रान्स्पोर्टेशन पुरेसे नाही. वाहतूक कोंडी नित्याची आहे.
- अमोल आणि स्नेहल गोरे, थेरगाव