Tue, March 28, 2023

शाळांवर कारवाई करण्याची रयत विचार मंचची मागणी
शाळांवर कारवाई करण्याची रयत विचार मंचची मागणी
Published on : 27 February 2023, 2:29 am
पिंपरी, ता.२७ ः महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनाधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्यावर कारवाई अद्याप केलेली नाही, अशा शाळांवर कारवाई करण्याची मागणी रयत विद्यार्थी विचार मंचाने केली आहे. याबाबत संस्थेचे संस्थापक धम्मराज साळवे व प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ‘सरकारची कोणतीही परवानगी न घेता या शाळा राजरोसपणे चालवल्या जातात. शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी शाळा चालू झाल्यानंतर या शाळांना केवळ नोटीस बजावली जाते. मात्र, अनाधिकृत शाळांच्या वतीने या नोटीसला केराची टोपली दाखवली जाते. त्यानंतर मात्र वर्षभर या शाळा चालू राहतात व शिक्षण विभाग देखील पुढील शैक्षणिक वर्ष येईपर्यंत शांत राहतो. गेली अनेक वर्ष या शाळांवर ठोस अशी कारवाई होत नाही.’