कामगार साहित्य संमेलनात रंगले अभिरूप न्यायालय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कामगार साहित्य संमेलनात 
रंगले अभिरूप न्यायालय
कामगार साहित्य संमेलनात रंगले अभिरूप न्यायालय

कामगार साहित्य संमेलनात रंगले अभिरूप न्यायालय

sakal_logo
By

पिंपरी, ता. २८ ः महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित कामगार साहित्य संमेलनात महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेने अभिरूप न्यायालय सादर केले. हिवरे बाजारचे पोपटराव पवार आरोपीच्या भूमिकेत होते. पुरुषोत्तम सदाफुले यांच्या संकल्पनेतून आणि कवी उद्धव कानडे यांनी लेखन केले होते. मंडळाचे कल्याण आयुक्त रवीराज इळवे न्यायाधीश होते. सरकारी वकील उद्धव कानडे, आरोपीचे वकील श्रीकांत चौगुले, पोलिस निरीक्षक सुदाम भोरे, पट्टेवाला राजेंद्र वाघ, पोलिस सुरेश कंक, बाजीराव सातपुते, अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, लेखनिक किरण भावसार आणि साक्षीदार अरुण म्हात्रे, सुनिताराजे पवार, डॉ. मुकुंद कुळे, बाळासाहेब बाणखेले होते. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने आयोजित केलेल्या या पुढील सर्व कामगार साहित्य संमेलनामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांनी आलेच पाहिजे अशी शिक्षा त्यांना सुनावली.