
निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचा महापालिकेतर्फे सत्कार
पिंपरी, ता. २८ ः महापालिका सेवेतून नियमित वयोमान व स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या २५ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते सत्कार केला. यात उपअभियंता सुनील हरिदास, मुख्याध्यापिका आरेफा शेख, उज्ज्वला ढमढेरे, कनिष्ठ अभियंता प्रदीप बडदे, असिस्टंट मेट्रन व्हिक्टोरिया नाडार, जयश्री बोदूल, लिपिक सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक अनिता जोशी, उपशिक्षिका आशा बोठे, शलाका कासार, रेखा कुमठेकर, निर्मला सातव, मजूर शंकर काटे, संभाजी लिमन, दौलत भोईर, सफाई कामगार सुरेखा म्हस्के, लक्ष्मीबाई शिंदे, भागवत थोरात, राजू खरात, सफाईसेवक अशोक वाघमारे, सूर्यकांत घोंगडे, कुचराकुली आकाश कांबळे, प्रकाश गवळी, बाळकृष्ण साळवे, गटरकुली अनिल वायदंडे यांचा समावेश आहे. प्रफुल्ल पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी आभार मानले.