Sat, March 25, 2023

महिलेसह मुलाला मारहाण
महिलेसह मुलाला मारहाण
Published on : 1 March 2023, 9:09 am
पिंपरी, ता. १ : शेतातील पिकाचे नुकसान करण्यापासून अडविल्याने महिलेसह तिच्या मुलाला शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चाकणमधील राक्षेवाडी येथे घडला. महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार सत्यवान ज्ञानोबा राक्षे, संतोष बाळू राक्षे, बाळू नामदेव राक्षे, सुभाष ज्ञानोबा राक्षे, किरण दिलीप कौटकर व पाच महिला (सर्व रा. राक्षेवाडी, चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सत्यवान व संतोष हे शेतात ट्रॅक्टर फिरवत असताना फिर्यादी, त्यांचे पती, मुलगा व मुलगी हे सर्वजण मका पिकाचे नुकसान करण्यापासून त्यांना अडवत होते. दरम्यान, इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. त्यामध्ये फिर्यादी व त्यांच्या मुलाच्या हाताला दुखापत झाली.