पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये
वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक
पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक

पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये वाकडच्या अक्षयाला सुवर्णपदक

sakal_logo
By

पिंपरी, ता. १ ः फेडरेशन कप इक्विप पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप भगवतीनगर (जम्मू) येथे झाली. त्यात महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात वाकड येथील अक्षया शेडगे हिचा सहभाग होतो. तिने ६९ किलो वजनगटात स्वॅट २१२.५ किलो, बेंचप्रेस ११७.५ किलो आणि डेडेलिफ्ट २०५ किलो असे एकूण ५३५ किलो वजन उचलून प्रथम क्रमांकासहित सुवर्णपदक पटकावले. डेडेलिफ्ट प्रकाराच स्वतःचाच विक्रम मोडून नवीन राष्ट्रीय विक्रम केला. ‘स्ट्रॉंग वुमन फस्ट रनर अप’ किताबही पटकावला. मे महिन्यात केरळमध्ये होणाऱ्या एशियन पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तिची निवड झाली आहे.
--
फोटोः 27894