
वाचकपत्र धोकायदायक लोखंडी कुंपणे काढा
मुंबई-पुणे महामार्गावरील देहूरोड ते निगडी रस्त्यावर ठिकठिकाणी वृक्ष संरक्षक सुरक्षा व्यवस्था एमएसआरडीसीने केली होती. हरित लवाद न्यायालयीन प्रक्रियेचा तो एक भाग होता. काही वृक्षांचे पुनःरोपण प्रशासनाने त्यावेळी केले होते. परंतु, रस्त्यावरील काही वृक्ष चार वर्षांत वाळून गेले आहेत. त्याकडे, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. हे वृक्ष भविष्यात अडचणीचे ठरणार असल्याने त्यांची देखभाल केली गेली नाही. आता काही ठिकाणी त्यांना लावलेले संरक्षक कुंपण वाहने धडकून तुटले आहेत. सध्या या ठिकाणचे वृक्ष गायब झाले असून, रस्ता ठीकठाक आहे. अशा धोकादायक ठिकाणची लोखंडी कुंपणे मोठा अपघात होण्यापूर्वी संबंधित विभागाने काढून रस्ता मोकळा करावा. काही ठिकाणी वृक्षांना कुंपण नाहीत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या चार किलोमीटर रस्त्याची पाहणी करून धोकादायक ठिकाणची दुरुस्ती करावी.
- दिलीप डोळस, तळेगाव दाभाडे
फोटो ः 27893